दिव्य दत्तात्रेय स्तोत्र !
दिव्य दत्तात्रेय स्तोत्र ! ||श्री दत्तात्रेय स्तोत्र|| हे स्तोत्र अतिशय दिव्य असून श्रीदत्तात्रेयांचे साक्षात् दर्शन करविणारे आहे. हे स्तोत्र श्रीनारदपुराणातील असुन हे स्वतः श्रीनारदमुनींनीच रचले आहे. नारदमुनींच्या नामस्मरणाबाबत आपण सर्वच जाणून आहोत . सतत भगवान नारायणाच्या नामाचा नामघोष करीत नारद मुनींनी वैकुंठाचे कायम सदस्यपद आणि भगवंताच्या हृदयात प्रवेश मिळविला. भगवान दत्तात्रेय हेच भगवान विष्णू असून यांच्या नानारूपधर ख्यातीची नारदमुनींना कल्पना होती अर्थात आहे. या स्तोत्राची रचना करताना नारदमुनींनी सामान्यजनांस सहज आकलन व्हावे आणि सर्वांकडून स्तुतीरूप स्मरण भक्ती व्हावी हि इच्छा समोर ठेवली होती . दत्तात्रेय नमोस्तुते हे धृपद आणि नाना परीने दत्त महाराजांची आळवणी करणारे हे स्तोत्र रचताना दत्त महाराजांच्या दर्शनाची अभिलाषा नारद मुनींना असावी आणि दत्त महाराजांनी आपले स्मर्तृगामी हे बिरुद सार्थ करीत मुनींना अगदी निजस्वरूपात दर्शन दिले असावे असे या स्त...